Friday, 18 October 2013

[ ::: ♥Keep_Mailing♥ ::: ]™ कोजागरी पौर्णिमा ....

कोजागरी पौर्णिमा ....
आपली कालगणनाच मुळी चंद्रकलांवर आधारलेली. चंद्राला सर्वोच्च
मान मिळालाय तो आपल्या कालगणनेकडून. मराठी पंचांगात प्रत्येक
पौर्णिमेचे महत्त्व आगळेवेगळे....
कोजागरी पौर्णिमा ही आपल्या प्रत्येक पूर्ववत पौर्णिमेकडून शौर्य,
ज्ञान, सेवा, श्रद्धा, प्रेम इत्यादी गुण आत्मसात करून
आपल्याला देते...!!! आश्विन पौर्णिमेला चंद्राची किरणे अतिशय शांत
असतात. ती अंगावर पडणे हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते.
आयुर्वेदातही त्याचे महत्त्व सांगितले आहे म्हणूनच
या दिवशी चंद्राच्या पूजेला विशेष महत्त्व आहे......
चांदणं अंगावर घेत रात्र जागवण्याचा उत्सव म्हणजे कोजागरी.
भारतीय सण ऋतुमानात होणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने साजरे केले
जातात. प्रसन्न शरद ऋतूच्या आगमनात साजरा होणारा दिवस म्हणून
कोजागरीची ओळख आहे. हा दिवस आश्विन
प्रतिपदेला साजरा केला जातो. म्हणून तिला आश्विन
पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी आकाशात ढगाआड लपलेला चंद्र
आपले दर्शन देतो. हवेत हळूहळू गारवा वाढू
लागतो आणि चंद्राच्या शीतल, शांत
किरणांची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा मसालेदार
दुधाचा आस्वाद घेत उत्साहात साजरी केली जाते.....
कोजागरीच्या रात्री देवी महालक्ष्मी 'को जागर्ति' असे विचारत
प्रत्येक घराघरात डोकावते. कोण जागे आहेत ते पाहते. जे जागे आहेत
त्यांना प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. येथे नुसते 'जागे राहणे' हे अभिप्रेत
नाही. जागे राहणे म्हणजे 'न झोपणे नव्हे' तर जागृती, सावधानता.
कोजागरीच्या रूपाने प्रत्येक घरात
डोकावणारी ही लक्ष्मी या जागृतीचे प्रतीक आहे. कोजागरी म्हणजे
'जागृतीचा संदेश.'शरद ऋतूमध्ये वाढणाऱ्या पित्ताने शरीराला त्रास
होऊ नये यासाठी सुवासिक जल, थंड पेयं घ्यावीत, चंदप्रकाशात बसावं,
मोत्याच्या माळा धारण कराव्या आणि चंदनादी शीतदव्यांचे लेप
करावेत असं सांगितलं आहे.....
कोजागिरीच्या जागरणामागे एक अर्थ दडला आहे. वैद्यकशास्त्रात
बऱ्याच अवघड समस्यांची उकल करण्यासाठी वरवर साधा दिसणारा पण
खोल अर्थ असणारा प्रश्न विचारून बुद्धीची कसोटी लावली जायची.
त्यातला एक प्रश्न म्हणजे 'को जागर्ति...?' म्हणजे कोण
जागा आहे....? अर्थातच हे जागरण म्हणजे सर्वांची प्रिय झोप सोडून
केलेलं 'जागरण' नसून आपल्या ऋतूबदलांची, बाहेरच्या वातावरणात
झालेल्या फरकाची नोंद कोणी घेतली आहे का...??
आणि आपल्या दिनचर्येत, ऋतूचर्येत फरक केला आहे का...?? असे सूचक
प्रश्न समाजाला विचारून त्याला जागरूक करण्याचा प्रयत्न ....


--

नितीन राऊळ .
मराठा तितुका मेळवावा , महाराष्ट्र धर्म वाढवावा ||
मराठी भाषा , मराठी संस्कृती ,मराठी माणसे ...

--
You received this message because you are subscribed to the Google Groups "Keep_Mailing" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to keep_mailing+unsubscribe@googlegroups.com.
To post to this group, send email to keep_mailing@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/keep_mailing.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.

No comments:

Post a Comment